'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये रिस्टार्ट एंटरटेनमेंटची मोहोर
बारामतीच्या सुरांचा विश्वविक्रम! १२ तास, १२५ गाणी; 'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये रिस्टार्ट एंटरटेनमेंटची मोहोर बारामती (प्रतिनिधी): विद्येचे आणि कलेचे माहेरघर असलेल्या बारामती नगरीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर 'रिस्टार्ट एंटरटेनमेंट ग्रुप'ने सलग १२ तास मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण करत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत 'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये या विक्रमाची सुवर्ण अक्षरात नोंद करण्यात आली आहे. स्वरयज्ञाने नटराज नाट्य कला मंडळ दुमदुमले नटराज नाट्य कला मंडळ येथे आयोजित या भव्य सोहळ्यात सकाळपासूनच सुरांचा वर्षाव सुरू झाला. निर्माता-दिग्दर्शक समीर पठाण आणि प्रा. रमेश मोरे यांच्या कल्पक नियोजनातून हा कार्यक्रम साकारला होता. सलग १२ तास चाललेल्या या सादरीकरणात एकूण १२५ पेक्षा जास्त गाणी सादर करण्यात आली. ४५ कलाकारांचा सहभाग या ऐतिहासिक विक्रमात बारामती आणि परिसरातील तब्बल ४५ गायक कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला. यात अनुभवी गायकांपासून ते उदयोन्मुख प्रतिभेपर्यंत सर्वांचा समावेश होता. प...