सिद्धेश्वर निंबोडीची कानिफनाथ यात्रा साधेपणाने

अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सिद्धेश्वर निंबोडीची कानिफनाथ यात्रा साधेपणाने साजरी


 
​करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून लांडगे परिवाराकडून आदर्श श्रद्धांजली

​सिद्धेश्वर निंबोडी: (बहुजन हितार्थ प्रतिनिधी) 

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर, सिद्धेश्वर निंबोडी येथील श्री कानिफनाथ यात्रा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी होणारे तमाशा, कुस्त्यांचा हगामा आणि फटाक्यांची आतिषबाजी यांसारखे सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून, केवळ धार्मिक विधी पार पाडत गावाने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
​सिद्धेश्वर निंबोडी येथील कानिफनाथ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्थायिक झालेले नागरिक आपल्या गावी एकत्र येत असतात. मात्र, दादांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी लांडगे कुटुंबीय आणि यात्रा कमिटीने कोणताही उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला.
​याबाबत माहिती देताना यात्रा कमिटीचे सदस्य अनिल जालिंदर लांडगे, विशाल संजय लांडगे, छगन गंगाराम लांडगे, दादासो लांडगे, महादेव लांडगे, देविदास लांडगे  आणि गणेश लांडगे यांनी सांगितले की, "दादांचे निधन ही आमच्यासाठी मोठी हानी आहे. त्यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही यंदाचे सर्व सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केवळ पारंपारिक धार्मिक विधी करून यात्रा संपन्न करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला."
​यावेळी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने कानिफनाथांचे दर्शन घेतले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता शांततेत धार्मिक विधी पार पाडून ग्रामस्थांनी स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये रिस्टार्ट एंटरटेनमेंटची मोहोर

बारामतीच्या कृषी महाविद्यालयाचा झेंडा दिल्लीत; प्रज्वल पोळची UPSC परीक्षेत बाजी!