राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 29 मार्चला होणार भव्य सत्कार


मुंबई दि. 26 -  राज्यसभेत सलग तिस-यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं येत्या रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता चेंबुरच्या फाईन आर्ट्स सभागृहात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. निळया पगडीचा मुकुट घालुन रिपब्लिकन हदय सम्राट असणारे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी दिली आहे.  

रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सत्कार समारंभास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीया नेत्या सिमाताई आठवले, युवानेते कुमार जीत आठवले, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्यासह अनेक मान्यंवर नेते या सत्कार सोहळयास उपस्थित राहणार.  

या सत्कार सोहळयास दक्षिण मध्य मुंबई जिल्हयातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी केले आहे.  

Comments

Popular posts from this blog

सिद्धेश्वर निंबोडीची कानिफनाथ यात्रा साधेपणाने

'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये रिस्टार्ट एंटरटेनमेंटची मोहोर

बारामतीच्या कृषी महाविद्यालयाचा झेंडा दिल्लीत; प्रज्वल पोळची UPSC परीक्षेत बाजी!